आणखी थोडेसे पुढे चालून गेल्यावर, आपल्या हातातील ज्या काठीने मोशेने अनेक चमत्कार केले त्या काठीचे  प्रतीकात्मक

रूप असलेली लोखंडी काठी व तिला लपेटलेला पितळी साप  आपल्याला दिसते  . हे सर्व काही पाहिल्यावर, परमेश्वराचा

महान संदेष्टा, ज्याने परमेश्वराच्या निवडलेल्या प्रजेचे चाळीस वर्ष नेतृत्व केले त्या महान व्यक्तिमत्वाची, मोशेची कबर

असलेले  हे ठिकाण आपल्याला आपसूक बायबलमधील वर्णिलेल्या त्या प्रसंगात घेऊन जाते, अन आपसूकच तो प्रसंग

आपल्या सामोरे घडतोय असे दिसू लागते.

माझी वारी – पवित्र भूमीची
एकविसाव्या शतकातील मानवी जीवन हे विविध सुख सुविधांमुळे समृद्ध बनले आहे, तरीपण माणूस नव्या सुखाच्या
शोधात भटकत असतो. कधी समुद्रतीरी, कधी डोंगरदऱ्यात तरी कधी जंगल खोऱ्यात. ह्या भटकंतीतून मिळणाऱ्या
मानसिक समाधानाच्या पुंजीतून तो आपले जीवन आणखी सुखासीन बनवत असतो. कुणीतरी विचारवंताने लिहिले आहे
कि पैशाने औषध मिळते, आरोग्य नाही. पैशाने सुविधा मिळतात, सुख नव्हे. हे बऱ्याच अंशी किंबहुना शत प्रतिशत खरे
आहे तरीपण माणसाने पैसे खर्चून केलेल्या भटकंतीने बऱ्यापैकी अनुभव, सुख, समाधान मिळते. एक जुनी म्हण आहे,” जो
फिरेल तो चरेल .” मी तरी ह्या म्हणीशी पूर्णपणे सहमत आहे,,, माझ्या थोड्याफार भटकंती किंवा विदेशवारीच्या
जोरावर. 
०३ मे २०१५ ह्या दिवशी, पन्नास लोकांचा समूह घेऊन मी माझ्या पहिल्या वहिल्या पावित्र भूमीच्या व्यावसायिक
यात्रेला प्रारंभ केला. “व्यक्ती तितक्या प्रकृती, अन प्रकृती तितक्या विकृती.” ह्या उक्तीनुसार पन्नास वेग वेगळ्या
विचारसरणीच्या लोकांना घेऊन , पवित्रभूमीची तीर्थयात्रा ह्या एका उद्देशाने आम्ही  मुंबई विमानतळावर मध्यरात्री १२
वाजता पोहोचलो. सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही सर्वजण आम्हाला नेमून दिलेल्या प्रवेशद्वाराजवळ विमानाची वाट
पाहत बसलेलो. खरेतर हि वेळ म्हणजे निद्रा देवीच्या कुशीत पहुडण्याची पण पन्नास लोकांची जबाबदारी व ज्या
जगाबद्दल आजवर इतके वाचले आहे त्या अरब / इस्रायली जगाची उत्सुकता, ह्या दुहेरी भावनेच्या हिंदोळ्यावर हेलकावे
खात असताना विमान आगमनाची सूचना कधी झाली ते देखील कळले नाही. अबुधाबी देशात तीन तासाचा थांबा घेऊन
दुपारी साडे बाराच्या वेळेत आम्ही सर्वजण क्विन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो.. जॉर्डन म्हणजे अरब देश,
अरब देश म्हटलं कि पांढरे झब्बे घातलेले अरब हबशी अशी काहीशी समज असलेल्या मला आजूबाजूला सुटाबुटात व
डोक्यावर चौकड्याचा फडका बांधलेले तांबूस गोऱ्या कातडीचे माध्यम बांध्याचे लोक बघून जरासा धक्काच बसला.
खरतर माझी देखील हि पहिलीच व्यावसायिक वारी , त्यामुळे मी देखील थोडासा बावरलेला, गोंधळलेला होतो. पण
संघनायकच खचला तर संघ क्षणात धाराशायी पडेल ह्या जाणिवेने उसने अवसान दाखवत मी पुढे चालत होतो, पण माझे
दोन डोळे दोन वेगवेगळ्या दिशेला, जॉर्डन देशातील माझा प्रतिनिधी, जो माझ्या हातातील ट्रॅवेलो फॅक्टरी ह्या माझ्या
कंपनीच्या चिन्हाला पाहून, मला कुठून हातवारे करत  सामोरे येतोय का हे मी शोधत होतो. इतक्यात भास व्हावा
ह्याप्रमाणे मला कुणीतरी , रकेश ,रकेश ( राकेश ह्या माझ्या नावाचा अरबी पद्धतीने केलेला उच्चार ) म्हणून हाक मारत
असल्या सारखे वाटले . पाहतो तर एक सव्वा सहा फूट उंचीचा, करड्या रंगाची दाढी राखलेला, सूट परिधान केलेला एक
इसम, हातातील कागद हलवत मला हातवारे करत होता 
भरकटलेल्या तारूला दीपस्तंभ दिसावा अन जहाजाच्या खलाशाला जितका आनंद व्हावा तितकाच अन तसाच आनंद त्या
इसमाला  पाहून मला झाला . आपल्या पूर्ण समूहाला घेऊन त्या प्रतिनिधीच्या सूचनेप्रमाणे पुढचे सर्व सोपस्कार पार
पाडून आम्ही आमच्या नियोजित कार्यक्रमासाठी विमानतळाबाहेर पडलो,


                                             नेबो पर्वत – संदेष्टा मोशेचा डोंगर 
 जवळपास बारा तासाच्या प्रवासामुळे शरीर खूप थकलेले व भुकेलेले  असले तरी  , पण बायबल मधले एक अति
महत्वाचे स्थळ आपणा सर्वाना खुणावत असते .  साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण आपल्याला खुणावत
असलेल्या स्थळाच्या आसपास पोहोचतो . योगायोग असा कि जी जागा पाहण्यास आपण  आतुर असतो  त्या जागेच्या
लगतच आपल्या  दुपारच्या जेवणाची सोय केलेली असते. दुपारचे जेवण घेत असताना आपण  नेबो पर्वत , त्या जागेवर
उभारलेल्या संदेष्टा मोशेच्या आयुष्यातील एका महत्वाच्या प्रसंगाचे प्रतीक असलेल्या पितळी काठी आणि त्याला
लपेटलेला साप , व तिथे उभारलेले भव्य चर्च हे पाहू शकतो . साधारण एका तासाभराच्या अवधीत जेवण आटोपून 
आपल्या  सहल मार्गदर्शका बरोबर आपण  नेबो पर्वतावर पोहोचतो . दुपारची वेळ असून देखील वातावरण  

प्रदूषणरहित असल्या कारणाने उन्हाची झळ इतकी जाणवत नाही . प्रवेश शुल्क भरून आत मध्ये प्रवेश करतानाच त्या
वास्तूची भव्यता व एक प्रकारची गंभीरता जाणवू लागते. यानंतर थोडेसे चालून गेल्यावर समोर दगडाचे एक मोठे शिल्प
दिसते.  दुरून पाहिले असता एखाद्या चेहर्‍यासारखे दिसणारे हे शिल्प जवळ जाताच आणखी स्पष्ट होते. शिल्पकाराने
अतिशय कौशल्याने  एकाच दगडातून एका कोनात चेहरा, तर दुसऱ्या  कोनात  बायबल कोरले आहे. थोडेसे आणखीन पुढे
गेल्यावर कबरेचा एक मोठा गोलाकार  दगडी दरवाजा आपल्याला दिसतो  अन मनात प्रश्न उद्भवतो कि शकडो फूट उंच
असलेल्या ह्या डोंगरावर हा दगडी दरवाजा कसा काय ?
 
आणखी थोडेसे पुढे चालून गेल्यावर, आपल्या हातातील ज्या काठीने मोशेने अनेक चमत्कार केले त्या काठीचे  प्रतीकात्मक
रूप असलेली लोखंडी काठी व तिला लपेटलेला पितळी साप  आपल्याला दिसते  . हे सर्व काही पाहिल्यावर, परमेश्वराचा
महान संदेष्टा, ज्याने परमेश्वराच्या निवडलेल्या प्रजेचे चाळीस वर्ष नेतृत्व केले त्या महान व्यक्तिमत्वाची, मोशेची कबर
असलेले  हे ठिकाण आपल्याला आपसूक बायबलमधील वर्णिलेल्या त्या प्रसंगात घेऊन जाते, अन आपसूकच तो प्रसंग
आपल्या सामोरे घडतोय असे दिसू लागते. ह्या लोखंडी काठीच्या पायथ्याशी उभे राहून पाहिले असता आपल्या डाव्या
हाताला दिसतो  तो मृत समुद्र, मृत समुद्रा पलीकडे यहूदीया, त्या पलीकडे जेरुसलेम.  आपल्या उजव्या हाताला दिसतो
तो  इस्राएलच्या उत्तरेकडील भाग अन त्याही पलीकडे ज्या भागात  हजारो वर्षांनी इस्रायली लोकांनी प्रवेश केला त्या 
प्राचीन शहर जेरिकोचा नजारा. साधारणपणे मानवी स्वभाव हा संशयी असतो, बायबल मध्ये लिहिलेले खरंच घडलंय
का असा प्रश्न मनाला टोचत असतो पण ह्या ठिकाणाला भेट दिली असता.  इथली दृश्य पाहिली असता कि खात्री पटते कि
जे लिहिलंय ते काल्पनिक नसून खरोखरच वास्तव आहे. मन भरेपर्यंत तो नजारा पाहून, तिथल्या चर्च मध्ये थोडावेळ
शांत बसून राहिल्याने मन रिकामं अन शांत होते. त्यानंतर पुढे आपण  मदाबा शहरात प्रवेश करतो. तिथे उभारलेल्या संत
जॉर्जचे चर्च, त्या चर्च मधील भिंतीवर रंगवलेला हिब्रू लोकांचा इजिप्त – कनान प्रवासाच्या नकाशाचे वाचन करून पुढे
मदाबा शहराची धावती सैर करून संध्याकाळी आपण आपल्या  हॉटेल निवासासाठी परत येतो , आलेला शिणवटा दूर
सारून, दुसऱ्या दिवसाच्या स्थळ भेटीसाठी  मन आणि शरीर ताजतवानं करण्यासाठी.
 
हवाई प्रवास -: जॉर्डन देशासाठी सध्यातरी मुंबईहून कोणतेही विमान थेट जात नसल्याकारणाने पूर्व मध्य अरब देशमार्गे
जाणाऱ्या विमानसेवांशिवाय सध्यातरी कोणताच पर्याय नाही.
विमानसेवा निवड -: तसा एकंदरीत साडेपाच तासाचा हवाई प्रवास असला तरी मध्ये असलेला विसावा अन बदलावे
लागणारे विमानतळ ह्यामुळे होणारी दमछाक, व त्यामुळे लागणारी भूक ह्या गोष्टीची दखल घेऊन स्वस्त विमानसेवा न
घेता चांगली नावाजलेली व नाश्ता / न्याहारी समाविष्ट असलेली हवाईसेवा निवडणे कधीही फायदाचे.
कागदपत्रे -: पासपोर्ट, व्हिसा प्रत, विमान तिकीट, प्रवास विमा , कार्यक्रम पत्रिका, आपल्या सहल आयोजकाचे ओळखपत्र
किंवा भेट पत्र  ह्याचा एक छायांकित संच आपल्याकडे असणे सोयीस्कर.
खाद्यपदार्थ -:  एखाद्याला जेवणानंतर, दुपारी वा प्रवासात खाण्याची सवय असल्यास, किंवा परदेशी जेवणाची आबाळ
होते असल्यास  सुका मेवा, किंवा हवाबंद सुके फराळाचे पदार्थे सोबत घेणे फायदेशीर, पण मोजकेच कारण अरब देशात
खायची आबाळ होते असा माझा तरी अनुभव नाही
कपडे -: सुती, तलम, सुटसुटीत कपडे, जास्तीचे अंतर्वस्त्र, दुपट्टा  पायमोजे, टोपी गरजेची  अन निकडीची 
अतिरक्त वस्तू -: गॉगल , उष्मा दाह पासून वाचण्यासाठी मलम, आपली नियमित औषधे. एक डायरी, पेन व बायबलची
प्रत.

विदेशी चलन -: माणसी कमीत कमी पाचशे अमेरिकन डॉलर. शक्य असल्यास  त्या त्या देशाचे स्थानिक चलन थोड्या
प्रमाणात .